दुचाकी चोरीच्या सत्रानंतर भुसावळातून अडीच लाखांची चारचाकीच लांबवली


After a session of two-wheeler theft, only a two-and-a-half lakh four-wheeler was recovered from Bhusawal भुसावळ : शहरात दुचाकी चोरट्यांनी उच्छाद मांडला असतानाच साक्री फाटा, छायादेवी राका नगर भागातून अडीच लाख रुपये किंमतीची चारचाकी लांबवण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अडीच लाखांच्या चोरी प्रकरणी गुन्हा दाखल
किशोर प्रभूदास निकम (36, छायादेवी राका नगर, फेज- 2, साक्री फाटा, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी घराबाहेर चारचाकी (एम.एच.40 के.आर.7362) ही लावली असता चोरट्यांनी बुधवार, 14 जून रोजी मध्यरात्री दिड वाजेनंतर चोरट्यांनी ती लांबवली. सर्वत्र शोध घेवूनही कारचा तपास न लागल्याने बाजारपेठ पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जितेंद्र पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !