भुसावळातील सिंधी कॉलनीत 42 वर्षीय विवाहितेचा विनयभंग


A 42-year-old married woman was molested in Sindhi Colony in Bhusawal  भुसावळ : शहरातील सिंधी कॉलनीतील 42 वर्षीय विवाहितेचा संशयिताने अश्लील शिविगाळ करीत विनयभंग केला. या प्रकरणी विवाहितेने तक्रार दिल्यावरून संशयिताविरोधात बाजारपेठ पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयिताविरोधात गुन्हा दाखल
42 वर्षीय विवाहिता पतीसह सिंधी कॉलनीतील एस.बी.आय.बँकेजवळ वास्तव्यास आहे. बुधवार, 14 जून रोजी रात्री दहा वाजता संशयित विजय द्वारकादास बिजलानी (सिंधी कॉलनी, भुसावळ) याने विवाहितेला अश्लील शिविगाळ करीत तिचा हात पकडून विनयभंग केला. पीडीतेने पोलिसात तक्रार दिल्यानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सुमन राठोड करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !