भुसावळात तालुक्यात नवागतांचे स्वागत ; घोडागाडीवरून मिरवणूक

शाळा प्रवेशोत्सव : पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेशासह पुस्तकांचे वाटप ; स्वागताने चिमुकले भारावले


भुसावळ  :उन्हाळी सुटीनंतर शहर व ग्रामीण भागातील सर्व माध्यमांच्या शाळांना गुरुवार, 15 जूनपासून नियमित सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी नवागतांचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आली. शिंदी जिल्हा परीषद शाळेत चिमुकल्यांची बैलगाडी, घोडागाडी तसेच चारचाकी, रीक्षातून मिरवणूक काढण्यात आल्याने चिमुकले स्वागताने भारावले. सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प तसेच पुस्तके देवून स्वागत करण्यात आले तर बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेशही मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. दरम्यान, पहिल्याच दिवशी शाळेत दाखल झालेले विद्याथीर्र् गर्दी पाहून घाबरले तर काही रडायलादेखील लागले मात्र पालक व शिक्षकांनी त्यांना धीर दिला. नवागतांच्या स्वागतानंतर मेळावा क्रमांक दोनचेही आयोजन करण्यात आले.

शाळा प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात
भुसावळ : शहरातील नगरपरीषदेच्या 16 तर ग्रामीण भागातील जिल्हा परीषदेच्या 65 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात झाला. बहुतांश ठिकाणी गणवेश वाटप करण्यात आले तर सर्व माध्यमांच्या सर्व शाळांमध्ये क्रमिक शाळांमध्ये पुस्तकांचे वाटप करून नवागतांचे स्वागत व मेळावा क्रमांक दोनचे आयोजन करण्यात आल्याचे पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी किशोर वायकोळे म्हणाले. ज्या शाळेत पात्र विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही त्यांना आठवडेभरात गणवेश दिला जाणार असल्याचेही वायकोळे यांनी सांगितले.

श्री स्वामीनारायण गुरुकुल
साकेगाव :  श्री स्वामीनारायण गुरुकुलमध्ये शाळा प्रवेशोत्सवानिमित्ताने विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. हसत-खेळत विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे, या सकारात्मक दृष्टीकोनातून हसत-खेळत ज्ञानसंस्काराच बाळकडू पाजण्यासाठी गोष्टी स्वरूपाने मुख्याध्यापक प्रदीप महाजन तसेच शिक्षकवृंदांनी महत्त्व पटवून दिले. यावेळी संस्था प्रमुख ऋषिप्रसाद स्वामी, गोपाळ भगत, मुख्याध्यापक मनोज भोसले, प्रणिता पाटील, उज्वला धांडेतसेच शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

शिंदीत घोडागाडीवरून विद्यार्थ्यांची मिरवणूक
शिंदी, ता.भुसावळ :  शिंदी जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांची वाजत गाजत सजवलेल्या घोड्यावरून, फोर व्हीलर मधून, ऑटो रीक्षा तसेच बैलगाडी व ट्रॅक्टरवरून मिरवणूक काढण्यात आली. आगळ्या-वेगळ्या पद्धत्तीने झालेल्या स्वागतानंतर विद्यार्थी भारावले. शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प, फुगे, गोड जेवण देण्यात आले. शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक दोन घेण्यात आला. यामध्ये विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले. प्रत्येक स्टॉलवर विविध प्रकारचे खेळ, चित्रकाम, अंक मोजणे, अक्षर ओळख, वजन उंची घेण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तकांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कांचन परदेशी, सदस्य विक्रमसिंग चव्हाण, पशू वैद्यकीय डॉ.सचिन महाजन, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य चारुलता कोल्हे, अनिता तायडे, ग्रामपंचायत सदस्य युनूस छप्परबंद, आनंदा सपकाळे आणि पालक उपस्थित होते. मुख्याध्यापक भगवान बडगुजर, समाधान जाधव, मीनाक्षी पाटील, प्रीती फेगडे यांना परीश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या मिरवणुकीसाठी घोडा संदीप सपकाळे यांनी तर ट्रॅक्टर उपसरपंच कैलास पाटील, ऑटो रीक्षा विक्रमसिंग चव्हाण, कांचन परदेशी, फोर व्हीलर कार डॉ.सचिन महाजन, युनूस छप्परबंद, बैलगाडी ललित परदेशी यांनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल त्यांचे सर्व गावकरी, विद्यार्थी, पालक, पदाधिकारी यांनी खूप कौतुक करीत आभारही मानले.

श्री.र.नं.मेहता विद्या मंदिर
भुसावळ : हिंदी सेवा मंडळाद्वारा संचलित श्री.र.नं.मेहता विद्या मंदिर तथा छात्रस्मृती भवनात विद्यार्थ्यांचा शालेय प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हिंदी सेवा मंडल भुसावळचे कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडीयाले व सहमंत्री बिशनचंद्र अग्रवाल उपस्थित होते. याप्रसंगी प्रधानाध्यापिका रीता शर्मा यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना भेटवस्तू, पुष्पगुच्छ देण्यात आले. तसेच शासनाकडून देण्यात आलेल्या मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले.

के नारखेडे विद्यालय
भुसावळ : शहरातील के.नारखेडे विद्यालयात गुरुवारी सकाळी सात वाजता शाळा प्रवेश दिन उत्साहात साजरा झाला. संस्थेचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, संस्था सदस्य विकास पाचपांडे, संस्थेचे ऑननरी जॉइंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.बी.किरंगे, उपमुख्याध्यापक रमण भोळे, ज्येष्ठ पर्यवेक्षक वाय.एन.झोपे, एस.एल.राणे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पाठ्यपुस्तक व खाऊचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक नितीन किरंगे यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. काळाची पाऊले ओळखून विद्यार्थ्यांमध्ये संगणक शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील यांनी संगणकाचे महत्व विषद केले. सूत्रसंचालन एस.पी.पाठक यांनी केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !