मुक्ताईनगरात शिक्षकासह पोलीस पाटलाचे घर फोडले ; 66 हजारांचा ऐवज लंपास


In Muktai Nagar, police broke up Patla’s house along with the teacher; Lumpas instead of 66 thousand मुक्ताईनगर : शहरातील वेगवेगळ्या भागात चोरट्यांनी दोन बंद घरांना टार्गेट करीत सुमारे 66 हजारांचा ऐवज लांबवल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस पाटलासह प्राथमिक शिक्षकाचे बंद घर फोडण्यात आल्यानंतर शहरातील नागरीकांमध्ये भीती पसरली आहे. नागरीकांनी बाहेरगावी जाताना पोलिसांना सूचित करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

पोलीस पाटलाचे घर फोडले
दिलीप जनार्दन पाटील (42, मानेगाव, ता.मुक्ताईनगर) हे पोलीस पाटील असून त्यांचे शहरातील वॉर्ड क्रमांक 12 मधील जिजाऊ नगरात घर आहे. घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी 11 ते 14 जून दरम्यान साधून घरातून पाच हजारांची रोकड तसेच एक हजार रुपये किंमतीचे स्टीलचे नळ लांबवले. गुरुवारी हा प्रकार लक्षात आल्यानंतर पाटील यांनी मुक्ताईनगर पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे यांनी भेट देत पाहणी केली. तपास नाईक उमेश महाजन करीत आहेत.

गोदावरी नगरात शिक्षकाकडे धाडसी घरफोडी
गोपाल माधव चौधरी (57, गोदावरी नगर, प्लॉट नंबर 6, मुक्ताईनगर) हे प्राथमिक शिक्षक असून गोदावरी नगरात वास्तव्यास आहेत. गुरुवारी चौधरी हे शाळेत गेल्यानंतर चोरट्यांनी संधी साधत घरातील कपाटातून 32 हजार 500 रुपये किंमतीचे दागिणे तसेच 27 हजारांची रोकड असा एकूण 59 हजार 500 रुपयांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी चौधरी यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे यांनी भेट देत पाहणी केली. तपास हवालदार विनोद श्रीनाथ करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !