जुन्या वादातून मोहराळ्यातील तरुणाला पाच जणांची मारहाण


यावल : तालुक्यातील मोहराळा येथे 35 वर्षीय तरुणाला जुन्या भांडणाच्या कारणावरून पाच जणांनी जबर मारहाण केली व त्यांच्या डोक्यात बॅट मारून दुखापत केली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पाच जणाविरुद्ध दंगली सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुन्या वादातून केली मारहाण
मोहराळा, ता.यावल येथील सतीश उर्फ सुनील पांडुरंग अडकमोल (35) या तरुणाने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या घरामागील शेतात ते असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून संशयित हारून सलीम तडवी, अय्युब तुराब तडवी यांचा मुलगा, सुलतान नशीर तडवी यांचा मुलगा, मुबारक जमशेर तडवी यांचा मुलगा व चंदू उघडू नहाड (सर्व राहणार मोहराळा) हे आले व त्यांनी वाद घालत त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यांच्या डोक्यात बॅटने मारून दुखापत केली. या प्रकरणी पाच जणाविरुद्ध यावल पोलिसात दंगलीसह विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र पवार करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !