रावेरातील तरुणाची गळफास घेत आत्महत्या
A young man in Raver committed suicide by hanging himself रावेर : शहरातील संत रोहिदास नगरातील 24 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी घडली. उमेश श्रावण सूर्यवंशी (24, संत रोहिदास नगर, रावेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. या प्रकरणी रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
सूत्रांच्या माहितीनुसार, उमेश सूर्यवंशी या तरुणाने घरी कुणीही नसताना गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर रावेर पोलिसांना माहिती कळवल्यानंतर त्यांनी भेट पंचनामा केला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
तपास पोलीस नाईक अतुल तडवी करीत आहेत.
