बोदवडसह तालुक्यात धूळ पेरणीला सुरुवात


बोदवड : पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 16 जून उजाडलातरीदेखील पावसाचा पत्ता नाही वा वातावरण नसतानाच उन्हाचादेखील
जोर वाढतच आहे. आता वाट कुठपर्यंत पहायची व पाऊस येईलच या आशेपोटी तालुक्यात शेतकर्‍यांनी धूळ पेरणीला गती दिली आहे.

धूळ पेरणी म्हणजे एक प्रकारचा सट्टाच
धूळ पेरणी म्हणजे एक प्रकारचा सट्टाच असून कमी प्रमाणात पाऊस पडला व नंतर उघडला तर पेरणी वाया जाते मात्र वारेमाप पाऊस झाला तर उत्पन्नदेखील वाढते. बोदवड तालुक्यात जवळपास 80 टक्क्यांहून अधिक शेतकर्‍यांनी धूळ पेरणीला पसंती दिल्याचे चित्र आहे. कबडी या कपाशीच्या वाणाला यंदा सर्वाधिक मागणी राहिली तर नाही म्हटले तरी चढ्या भावाने शेतकर्‍यांनी गरजेपोटी या वाणाची खरेदी केल्याची चर्चा आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !