शिवबाच्या मावळ्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केला गौरव
रावेर : रायगडावर झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात रावेरातील काजल महाजन, महिमा महाजन, सोनाली चौधरी, परी महाजन, पल्लवी महाजन, सानिका सोनार, श्रद्धा महाजन आदींनी शिवकालीन खेळाची चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करीत जनतेचे लक्ष वेधल्याने त्यांच्या या खेळाला अधिक चालना मिळण्यासाठी रावेर पोलीस ठाण्यात कार्यक्रमानिमित्त आलेले जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्याहस्ते त्यांचा व प्रशिक्षक युवराज माळी यांचा गौरव करण्यात आला.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी आयएएस अधिकारी अर्पित चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, प्रांतधिकारी कैलास कडलग, रावेर पोलीस निरीक्षक कैलास नागरे, तहसीलदार बंडू कापसे, तहसीलदार मयूर कळसे, मुख्यधिकारी स्वालिया मालगावे, काँग्रेसचे युवा नेते धनंजय चौधरी व रावेर शहरातील प्रतिष्ठित नागरीक, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रल्हाद महाजन, माजी नगराध्यक्ष हरीश गनवाणी, दारा मेंबर, अशोक शेठ वाणी, संतोष शेठ अग्रवाल, बाजार समिती पाटील, भाजपा उपसभापती योगेश तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ.राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी किशोर तालुकाध्यक्ष पाटील, शैलेंद्र अग्रवाल, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमूद शेख, भाजपा शहराध्यक्ष दिलीप पाटील आदींची उपस्थिती होती.
