स्कूल चले हम : गुलाबपुष्प व पुस्तकांच्या भेटीने विद्यार्थी भारावले
भुसावळ : शाळा प्रवेशोत्सव सोहळा भुसावळसह विभागात मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर नियमित शाळांना सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी झालेल्या स्वागताने विद्यार्थी प्रचंड भारावले.
सरदार पटेल विद्या मंदिर
ऐनपूर, ता.रावेर : ऐनपूर परीसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिरात शाळा प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात साजरा झाला. शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी व पालकवर्गत उत्साह बघायला मिळाला. विद्यार्थ्यांचे स्वागत वह्या, पुस्तके, गुलाबपुष्प तसेच बिस्कीट, चॉकलेट देऊन करण्यात आली. या शैक्षणिक वर्षापासून पूर्व प्राथामिक वर्गाची सुरुवात करण्यात आली. उद्घाटन संस्थाध्यक्ष भागवत पाटील, चेअरमन श्रीराम पाटील, सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष रामदास महाजन, संचालक हरी पाटील, पी.आर.चौधरी, पी.एम.पाटील, विकास महाजन, डॉ.सतीश पाटील, कैलास पाटील, सहसचिव आर.एस.पाटील, रवींद्र पाटील, दिलीप पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक शुभम महाजन तर सूत्रसंचालन निकिता चौधरी तसेच आभार जयश्री सराफ यांनी मानले.
ज्ञानपूर्णा विद्यालय
मुक्ताईनगर : तालुक्यातील इच्छापूर-निमखेडी बुद्रुक येथील ज्ञान पूर्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना पुस्तक वाटपदेखील करण्यात आली. याप्रसंगी कर्की विद्यालयाचे शालेय समिती चेअरमन अनिल वाडीले हे अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य बी.डी.बारी, ज्येष्ठ नागरीक गोविंदा चौधरी, ज्येष्ठ शिक्षिका आशा कांडेलकर, सुधीर मेढे, बी.के.महाजन, महेंद्र तायडे, गणेश पवार, प्रदीप पाटील, मीनल कोल्हे, बाळासाहेब देशमुख, प्रा.मनोज भोई, अजिंक्य पाटील, विनोद पाटील, गोपाळ सपकाळ, बेबाबाई धाडे उपस्थित होते.
सरस्वती विद्या मंदिर
यावल : शहरातील सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना पुष्गुच्छ देवून विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे मुख्याध्यापक जी.डी.कुळकर्णी यांनी स्वागत केले. शाळेच्या पहिल्याच दिवशी पाचवी ते आठवीसाठी योजने अंतर्गत मोफत पुस्तकांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना संस्था चालक रमण देशपांडे, अरुण कुळकर्णी यांच्याहस्ते मोफत गणवेश वाटप करण्यात आले.
जे.टी.महाजन स्कूल
यावल : जे.टी.महाजन इंग्लिश स्कूलमध्ये शैक्षणिक वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. पहिल्या दिवशी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळेचा पहिला दिवस स्मरणात रहावा म्हणुन शाळेत सेल्फी पॉइंट उभारण्यात आला. शाळेत येणार्या प्रत्येक नवीन विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी सेल्फी काढून स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना पाटील यांनी केले.
बाल संस्कार शाळा
यावल : बाल संस्कार विद्या मंदिरात शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. शालेय परीसर रांगोळी, फुल, रंगीबेरंगी फुगे व फलक लेखन करून सुशोभीत करण्यात आला. याप्रसंगी संस्था अध्यक्ष महेश वाणी व मुख्याध्यापक सुनील माळी यांच्याहस्ते शालेय पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. शाळेच्या पहिल्या दिवसनिमित्त शालेय पोषण आहारात गोड पदार्थ जिलेबी देण्यात आली. प्रवेशोत्सव साजरा करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
हिंगोणा उर्दु शाळा
यावल : तालुक्यातील हिंगोणा जिल्हा परीषद उर्दू शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प दिल्यानंतर मोफत पुस्तके वाटप करण्यात आली. अध्यक्षस्थानी शालेय समितीचे सदस्य शब्बीर खान होते. शाळेचे मुख्याध्यापक अहमद खान, शेख मुक्तार, अली मोहमद खान, सल्लाउद्दीन शेख, आसीफ खान, साबीर खान, जमील शेख, हाजी करीम खाटीक आदी उपस्थित होते.
माध्यमिक विद्यालय, साकळी
साकळी : माध्यमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापिका संध्या अनंत शिंदे यांच्याहस्ते गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. पाचवी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शासनातर्फे आलेली नवीन पाठ्यपुस्तके देण्यात आली. विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात खिचडी व गोड शिरा खाऊ देण्यात आला. सूत्रसंचालन विद्यालयाच्या उपशिक्षिका शुभदा नेवे तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे उपशिक्षक हुकुमचंद पाटील यांनी केले.
शारदा विद्या मंदिर शाळा
साकळी : गावातील शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय शाळेत प्रवेशोत्सव व विद्यालयाचा 59 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष भास्करराव महाजन होते. व्यासपीठावर कार्याध्यक्ष प्रमोद सोनवणे, संचालक मुख्तार सरदार तडवी, सुनंदा बडगुजर, प्राचार्य आर. जे. महाजन, पर्यवेक्षक एस.जे.पवार, बी.ई.महाजन, सदाशिव निळे, एम.ए. महाजन, एन.पी.पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य आर.जे.महाजन यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते नवप्रवेशित विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन एम.ए.महाजन तर आभार आर.सी.जगताप यांनी मानले.
