हरभरा खरेदीत 29 शेतकर्‍यांची 30 लाखात फसवणूक


मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हाकाकोडा येथील खरेदी उपकेंद्रातून 29 शेतकर्‍यांचा 300 क्विंटल हरभरा खरेदी करून सुमारे 30 लाख 62 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

असे आहे नेमके प्रकरण
शासकीय हरभरा खरेदी उपकेंद्राचे चालक प्रफुल्लकुमार मुरलीधर पाटील (30, कुर्‍हा) यांच्या फिर्यादीनुसार, बोदवड तालुका फार्मर प्रोड्युसर कंपनी लि.चे संचालक शिवाजी गोविंदा ढोले (मनुर बुद्रुक), दीपक अनिल वराडे (घानखेड, ता.बोदवड) व चना खरेदी प्रमुख तथा महा स्वराज्य फार्मर प्रोड्युसर कंपनी लि.नाशिकचे शुभम निकम (रा.पंडित कॉलनी, नाशिक) या तिघांनी मार्च ते एप्रिल व मे मध्ये वेळोवेळी तसेच 6 एप्रिल रोजी कुर्‍हाकाकोडा येथे हरभरा खरेदी उपकेंद्रात फसवणूक केली. प्रति क्विंटल पाच हजार 335 या दरानुसार 21 शेतकर्‍यांकडील 300 क्विंटल हरभरा खरेदी झाल्यानंतर 16 लाख 500 रुपयांच्या मालाची पावती गहाळ केली तसेच तिघांनी बिल मंजुरीसाठी दिलेले 60 हजार रुपये व माझे प्रतिक्विंटल 100 रुपये, हमाली 50 रुपये व वाहतूक खर्च 50 रुपये असे एकूण दोन लाख 78 हजार 700 रुपये असे एकूण 30 लाख 62 हजार 297 रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !