भालशीव गावात मोटर सायकलचा बकरीला धक्का लागल्याच्या कारणावरून दंगल ; दोन्ही गटातील 13 जणांवर गुन्हा दाखल


Riot in Bhalshiv village due to motorcycle hitting a goat ; A case has been registered against 13 people from both the groups यावल : तालुक्यातील भालशीव गावात जिल्हा परीषदेच्या शाळेसमोर दुचाकीला बकरीला धक्का लागल्याच्या कारणावरून दंगल घडली. यामध्ये आठ जणांनी मिळून चौघांना जबर मारहाण करीत मोटरसायकलची तोडफोड केली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात आठ जणाविरुद्ध दंगलीसह विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला. दुसर्‍या गटाकडूनदेखील या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

बकरीला धक्का लागल्याने दंगल
भालशीव, ता.यावल या गावात जिल्हा परीषदेची शाळा असून या शाळेजवळ दुचाकीद्वारे बापू उर्फ विजय पुंडलिक सपकाळे (27, रा.पिंप्री) हा तरुण जात असताना त्याच्या दुचाकीचा धक्का बकरीला लागला आणि यावरून वाद वाढला. बापू सपकाळेसह विजय सपकाळे, पुंडलिक सपकाळे, भास्कर सपकाळे व धर्मेंद्र सपकाळे (चौघे रा.पिंप्री) या चौघांना लक्ष्मण जानकीराम कोळी, निलेश लक्ष्मण कोळी, कमलाकर रामा कोळी, सुनीताबाई लक्ष्मण कोळी, बापू नामदेव कोळी, रामा जानकीराम कोळी, देवडू नामदेव कोळी व आकाश निवृत्ती साळुंखे या आठ जणांनी जबर मारहाण केली. यात या चौघांना दुखापत झाली तसेच मोटरसायकलची देखील तोडफोड करून नुकसान करण्यात आले. या प्रकरणी बापू सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप सूर्यवंशी करीत आहे.

दुसर्‍या गटाकडून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
बकरीला मोटरसायकलचा धक्का लागल्यानंतर लक्ष्मण सपकाळे बोलले की, तू मोटरसायकल सांभाळून चालवत जा, बकरी लंगडी झाली. या बोलण्याचा राग येऊन पुंडलिक गोबा सपकाळे, भास्कर पुंडलिक सपकाळे, धर्मेंद्र पुंडलिक सपकाळे, बापू पुंडलिक सपकाळे व राजू रामदास सपकाळे या पाच जणांनी वाद घालत सपकाळे कुटुंबास मारहाण केली. मथुराबाई जानकीराम कोळी या जखमी झाल्या. या पाच जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात सुनीताबाई लक्ष्मण सपकाळे यांच्या फिर्यादीवरून दंगली सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !