कंडारी येथे 20 वर्षीय युवतीचा विनयभंग
20-year-old girl molested in Kandari भुसावळ : तालुक्यातील कंडारी येथे 20 वर्षीय युवतीचा तरुणाने विनयभंग केल्याची घटना शनिवार, 17 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली.
तरुणाविरोधात गुन्हा
कंडारी गावातील एका भागात 20 वर्षीय तरुणी कुटूंबासह वास्तव्यास असून मजुरी काम करून कुटूंबाला हातभार लावते. गावातील संशयित आरोपी गणेश लोखंडे (कंडारी, ता.भुसावळ) याने शनिवारी सकाळी तरुणीला मिठी मारून तिच्या मनाला लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केल्याने पीडीतेने शहर पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवल्यानंतर संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे करीत आहेत.
