भुसावळात विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या


भुसावळ : शहरातील गरूड प्लॉट भागातील रहिवासी सीमा उदय चौधरी (35) यांनी त्यांच्या राहत्या घरात रविवारी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. सीमा चौधरी यांनी आत्महत्या केली त्यावेळी घरात कोणीही नसल्याचे शहर पोलिसांनी सांगितले. सीमा चौधरी यांना तात्काळ पालिकेच्या दवाखान्यात आणण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी महिला मृत झाल्याचे सांगितले. शहर पोलिस ठाण्यात राहूल रमेश कोल्हे (रा. शारदा नगर, भुसावळ) यांनी दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी पुढील तपास करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !