भुसावळात दारू उधार न दिल्याने दुकान पेटवले


भुसावळ : उधारीत दारू न दिल्याचा राग आल्याने चौघा आरोपींनी जामनेर रोडवरील न्यू अशोका वाईन या दुकानाला शनिवारी मध्यरात्री 12.40 वाजेच्या सुमारास आग लावली मात्र सुदैवाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवता आल्याने अनर्थ टळला. न्यू अशोका वाईन या दारूच्या दुकानात शनिवारी चेतन उर्फ गुल्ल्या पोपट खडसे, हेमंत पैठणकर, सागर रवींद्र चौधरी व गोलू सुलताने (रा. भुसावळ) आदींनी उधारीत दारू मागितली मात्र ती न दिल्याचा राग आल्याने चौघांनी चाकूचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देत रात्री दुकान बंद झाल्यावर दुकानाच्या शटरला आणि आत काउंटरला आग लावली. मध्यरात्री दुकान मालक सुनील नागराणी यांना माहिती मिळताच त्यांनी दुकानाची पाहणी केली. नागराणी यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात वरील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !