फुपणी गावातील 45 वर्षीय विवाहितेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
जिल्हा शासकीय रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश
A 45-year-old married woman from Phupani village died due to electric shock जळगाव : पाण्याची इलेक्ट्रीक मोटार सुरू करताना विजेचा जोरदार शॉक लागल्याने जळगाव तालुक्यातील फुपणी गावातील 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजता घडली. जिजाबाई रोहिदास भील (45, फुपणी, ता.जळगाव) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू
जिजाबाई भील या पती व दोन मुलांसह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवार, 23 जून रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घरी पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी गेल्या असता त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अत्यवस्थ अवस्थेत नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी मयत घोषीत केले. यावेळी नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात गर्दी केली. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.