रावेरच्या सराफ बाजारातून चोरट्यांनी दोन मोबाईल लांबवले
रावेर : शहरातील सराफ बाजारातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे चौदा हजारांचे दोन मोबाईल लांबवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील गणेश ज्वेलर्स समोर महेश पाटील (रा.रसलपुर) हे सामान खरेदी करीत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्याजवळील 12 हजार 500 रुपये किंमतीचा व विवो कंपनीचा तसेच एक हजार 400 रुपये किंतीचा जिओ कंपनीचा मोबाईल चोरट्यांनी लांबवला. तपास पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
