फसवणूक टाळण्यासाठी सोशल मीडियाचा वापर जपून करा
नाहाटा महाविद्यालयात व्याख्यानात अॅड.प्रकाश साळशिंगीकर यांचे प्रतिपादन
भुसावळ : इंटरनेटमुळे जग जवळ आले असलेतरी समाज विघातक शक्तींकडूनही इंटरनेटचा फसवणुकीसाठी वापर केला जात असल्यानेच सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे सोशल मिडीया वापरताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन अॅड.प्रकाश साळशिंगीकर (मुंबई) यांनी येथे केले. भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील भूगोल शास्त्र मंडळ आयोजित भूगोल सप्ताह अंतर्गत सोमवारी ‘सायबर क्राईम’ या विषयावर अॅड.साळशिंगीकर बोलत होते.
यांची होती उपस्थिती
विचार मंचावर प्रमुख उपस्थिती महाविद्यालायचे उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एच. बर्हाटे, भूगोल विभाग प्रमुख प्रा.व्ही.पी.लढे, भूगोल सप्ताह समन्वयक प्रा. अनिल हिवाळे, प्रा.प्रशांत पाटील, प्रा.अजय तायडे, प्रा.मीनाक्षी बेदरकर, प्रा.जितेंद्र पाटील, प्रा.पी.एम.भगत, उदय वाणी यांची उपस्थिती होती



फसवणूक करणार्यांची सोशल मीडियावर नजर
अॅड.साळशिंगीकर म्हणाले की, व्हॉट्सअप, फेसबुकद्वारे अशा गुन्ह्यांचे प्रमाण जास्त असल्याने सजग होऊन वापर केला गेला पाहिजे. आपण कोणते व्हिडियो, इमेजेस, मेसेज टाकतो ते विचार करून टाकायला हवेत तर आप टाकलेल्या किंवा शेअर केलेल्या पोस्ट आणि मेसेजेस मुळे आपण अडचणीत यायला नको, याची काळजी घेणे गरजेचे आहे. आपले अकाऊंट आपचं पहतो असे नाही. फसवणूक करणारे अनेक लोक त्यावर नजर ठेवून असतात शिवाय बरेचशे खोटे अकाउंट निर्माण करून आपल्याला फसवण्याचा प्रयत्न केला जात असतो. सायबर क्राईम होऊ नये म्हणून आपणच आपल्या माहितीची काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले.
शिक्षण घेणे काळाची गरज
उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.बर्हाटे म्हणाले की, इंटरनेटचा वापर करून केल्या गेलेल्या गुन्ह्याला सायबर क्राईम म्हटले जाते. असे गुन्हे होऊ नये म्हणून जास्तीत-जास्त जनजागृती होणे ही काळाची गरज आहे आणि सायबर क्राईम विषयी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त शिक्षण घेणे महत्वाचे आहे. सूत्रसंचालन पूजा गायकवाड तर आभार प्रदर्शन स्वाती सुरवाडे यांनी मानले. प्रमुख पाहुण्यांचा परीरचय दामिनी इंगळे आणि प्रास्ताविक भूगोल सप्ताह समन्वयक प्रा.अनिल हिवाळे यांनी केले.
