पारंपरिक वाद्यांच्या गजरात भुसावळातील डॉ.उल्हास पाटील इंग्लीश मीडियम स्कूलमध्ये गणरायाचे आगमन
भुसावळ (सोमवार, 14 सप्टेंबर 2026) : गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. उल्हास पाटील इंग्लीश मीडियम स्कूल भुसावळ येथे आज दि. 14 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गणरायाचे आगमन झाले.
पारंपरिक वाद्यांच्या गजरात तसेच उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात गणरायाचे महाविद्यालय परिसरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. माजी खा डॉ उल्हास पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा-अर्चा करून गणरायाची स्थापना केली.



यावेळी प्रिन्सिपल अनघा पाटील, सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच नॉन-टीचिंग स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता. गणरायाच्या आगमनामुळे संपूर्ण महाविद्यालय परिसर भक्तिमय आणि आनंदमय वातावरणाने भारावून गेला.
