पाचोरा शहरातील 66 वर्षीय वयोवृद्धेचा सर्पदंशाने मृत्यू


A 66-year-old man died of snakebite in Pachora city पाचोरा : जेवण आटोपून भांडी घासत असताना 66 वर्षीय वयोवृद्धेला विषारी सर्पाने दंश केल्याने वयोवृद्धेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री आडेआठ वाजता घडली. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तुळसाबाई विठ्ठल भोसले (66, पााचोरा) असे मयताचे नाव आहे.

पाचोरा शहरात शोककळा
पाचोरा शहरातील वरखेडी रोडवरील भैरवनाथ नगर भागातील रहिवासी तुळसाबाई विठ्ठल भोसले या बुधवारी रात्री आडेआठ वाजता जेवण आटोपून भांडी घासत असतांना त्यांना विषारी सापाने चावा घेतला. यानंतर उपचारासाठी दाखल करण्याआधीच काही क्षणात त्यांचा मृत्यू झाला. मयत तुळसाबाई विठ्ठल भोसले यांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे यांनी केल्यानंतर ऐन आषाढीच्या दिवशी दुपारी 12.30 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाश्चात्य दोन मुले आहेत. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल मनोहर नाईक करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !