निंभोर्‍यात तब्बल 25 वर्षानंतर स्नेहमेळाव्यात भेटले विद्यार्थी


सोशल मीडिया व मोबाईलपासून मुलांना दूर ठेवण्याचा व्यक्त केला मानस.

निंभोरा- न्यू इंग्लिश स्कुलच्या 1994 च्या बॅचच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी तब्बल 25 वर्षानंतर एकत्र येऊन स्नेहमेळावा साजरा करीत शाळेतील आपापल्या आठवणी व गुरुजनांचे अनुभव कथन केले. यावेळी आपापल्या मुलांना सोशल मीडिया व मोबाईलचा वापर यापासून दूर ठेवून त्यांना खेळासह इतर गोष्टीत गुंतवण्याचे आवाहन करीत मुलांना वेळ देण्याबाबतचा मानस व्यक्त केला.

पुन्हा स्नेहमेळावा घेण्याचा निश्‍चय
या स्नेहमेळाव्यास निंभोर्‍यासह भुसावळ, जळगाव, पाचोरा, धुळे, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासह वेगवेगळ्या शहरांतून व गावांतून सर्व जण उपस्थित होते. यावेळी सर्वांनी आपापले अनुभव कथन करीत आपापल्या यशाची रहस्ये व त्या काळातील आपापला अनुभव कथन केला. पुढील स्नेहमेळावा निंभोरा येथील न्यू इंग्लिश स्कुलममध्ये घेण्याबाबत व आपल्या शाळेसाठी काहीतरी करण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी 25 वर्षानंतर भेटण्याचा आनंद सर्वांनी व्यक्त करून पुन्हा कुटुंबासह भेटण्याचा निर्धार व्यक्त करीत आपापल्या कार्यक्षेत्राकडे मार्गक्रमण केले.




यांचा होता स्नेहमेळाव्यात सहभाग
दीपक सोनार, विजय पाटील, दिनेश सोनार, प्रशांत ठाकरे, सुनील कोंडे, दीपक पाटील, विवेक नेहेते, रवींद्र भोगे, वंदना पाटील, मानसी फालक, जयश्री पाटील, सुवर्णा नेहेते, वैशाली गुरव, मोहिनी बोंडे, रेखा बर्‍हाटे, गोकुळ भोई, नितीन ढाके, दीपक चौधरी, डॉ.विजय नाईक, रवींद्र उंबरकर, चारूलता नेहेते, मीनाक्षी चौधरी, नीलिमा सरोदे, विकास पाटील, निशा बारबंद, संगीता जावळे, संदीप मोरे, भरत सोनवणे, सुवर्णा पाटील, मिलिंद राणे, डॉ.शैलेंद्र बर्‍हाटे, महेंद्र नेमाडे, अथर्व फालक आदींची उपस्थिती होती. यावेळी अथर्व दिनेश फालक याने आईवर तर गोकुळ भोई यांनी मैत्रीवर कविता सादर केली.
यशस्वीतेसाठी दिनेश फालक, रवींद्र भोगे, मानसी फालक आदींनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुनील कोंडे यांनी केले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !