भुसावळात 19 अंशांवरील पारा 16 अंशांपर्यंत घसरला


भुसावळ :  मकर संक्रांतीनंतर शहरातील कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली होती. रात्रीचे किमान 19 ते 21 अंशांवर पोचले होते. यामुळे थंडी गायब होण्याचा अंदाज होता मात्र दोन दिवसांपासून पून्हा तापमानात घट होऊन रविवारी किमान तापमान 16 अंशांवर पोहोचले आहे. शहरात 12 जानेवारीपासून तापमानात वाढ झाली होती. दिवसाचे कमाल तापमान 30 अंशांवर पोचले होते मात्र गेल्या दोन दिवसांपासून पून्हा थंडीची हूडहूडी सुरु झाली आहे. रात्रीचे किमान तापमान 19 ते 21 अंशांवरुन 16 अंशांवर पोचले आहे. यामुळे थंडीचे प्रमाण वाढले आहे. मकर संक्रांतीनंतर तापमानाचा पारा वाढतो, यंदाही तो वाढला. सध्या रात्रीचे किमान तापमान कमी झाले असले तरी दिवसांचे कमाल तापमान 30 अंशांवर स्थिरावले आहे. यामुळे रात्री थंडीचा तडाखा तर दिवसाच्या वेळी देखील शीतलहरींमुळे गारठा कायम आहे. शहरात अजून एक महिना थंडीची हूडहूडी कायम राहणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात अधिक प्रमाणात गारवा निर्माण झाल्याने जनजीवनावरही परीणाम होत आहे. सकाळी थंडीचे प्रमाण अधिक असल्याने उशिरा बाजारपेठ खुली होते तर सायंकाळी सात वाजेनंतर नागरीक घराबाहेर निघत नाही, यामुळे रात्री 10 वाजता बंद होणारी बाजारपेठ आता साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यानच ग्राहक नसल्याने बंद होत आहे.

रब्बीच्या पिकांना पोषक स्थिती
थंडीचे प्रमाण कमी झाल्याने विभागातील हरभरा व गहू पिकावर विपरीत परीणाम होण्याची शक्यता होती. थंडीचे प्रमाण कमी झाल्याने गव्हात ओंबी भरण्याच्या अवस्थेत बाधा निर्माण होऊन उत्पादन घटीचा अंदाज होता. यासह हरभरा पिकावरही घाटे भरण्याच्या अवस्थेत परिणाम होणार होता. मात्र पुन्हा थंडी वाढणार असल्याने या पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !