The trust of the voters will Not Be Broken ; Will Resign Tomorrow : MP Amol Kolhe याला म्हणतात नेता ! मतदारांच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही ; उद्याच राजीनामा देणार : खासदार अमोल कोल्हे
This is called a leader ! The trust of the voters will not be broken; Will resign tomorrow: MP Amol Kolhe शिरूर : मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेद्वारे इतिहास सांगण्याचा प्रयत्न करीत असल्याने मी नैतीक मुल्याच्या बरोबरच राहणं मला योग्य वाटते, सर्व राजकारण पाहता आपण आपला राजीनामा शरद पवार साहेबांकडे मंगळवारी सादर करणार असल्याचे खासदार कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदारांनी जे मतदान केलं ते एका विचारधारेवर विश्वासावर ठेऊन केले असल्याने मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून मी माझा खासदार पदाचा राजीनामा शरद पवार साहेबांकडे देणार आहे.
आतील आवाज म्हणतोय मी साहेबांसोबतच रहावं
राजकारणाची विश्वासर्हता, जबाबदारीची नैतिक मूल्य या सगळ्यांच्या विषयी मतदारांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होतोय तसेच आपला आतील आवाज म्हणतोय साहेबांसोबतच राहावं , म्हणून मी साहेबांसोबतच राहणार असे अमोल कोल्हेनी स्पष्ट केले आहे.




खासदार कोल्हे म्हणाले, शपथविधीची कल्पनाच नव्हती !
मी वेगळ्या कारणासाठी अजितदादांना भेटायला गेलो होतो, त्यावेळी आपणास कोणतीही कल्पना नव्हती की आज शपथविधी आहे. तेथे गेल्यानंतर शपथविधी असल्याची माहिती समजली. त्याचवेळी आपण कार्यालयाला राजीनामा तयार ठेवण्यास सांगितले होते. कारण मतदारांचा विश्वास तोडून यासाठी आपण राजकारणात आलेलो नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदारांनी जे मतदान केलं आहे ते एका विचारधारेवर, विश्वास ठेवून केलं आहे.