रावेर महसूलची उद्दिष्ट पूर्तीकडे वाटचाल


रावेर : रावेर महसूल विभागाकडून गौण-खनिजाची आतापर्यंत 94 टक्के वसूली झाली असून विविध टॉवरची 100 टक्के वसुली झाल्याची माहिती नायब तहसीलदार संजय तायडे यांनी दिली. मार्च महिना जवळ येत असल्याने महसूल विभागाने उद्दिष्ट पूर्तीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तालुक्यातील जिओ कंपनीच्या 27 टॉवरसह जीटीएल कंपनीच्या नऊ तसेच इंडीस कंपनीच्या 33 टॉवर असे एकूण 69 टॉवरकडून 35 लाख 50 हजारांची कर वसुली करण्यात आली आहे तर गौण खनिजापोटी दोन कोटी 34 लाखांची अर्थात 94 टक्के वसुली पूर्ण झाली आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !