रावेरात अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त
रावेर : उटखेडा रस्त्यावरील शिक्षक कॉलनीनजीक अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्यासह महसूल विभागाच्या पथकाने बुधवारी रात्री दिडच्या सुमारास पकडल्याने वाळू वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. एक ट्रॅक्टर रावेर तहसीलमध्ये तर दुसरे ट्रॅक्टर निंभोरा पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले. बुधवारी रात्री दिडच्या सुमारास अवैध गौण खनिज वाहतूक करणारे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर उटखेडा रस्त्यावर पकडण्यात आले तर विवरेच्या शाळेजवळ दुसरे ट्रॅक्टर पकडण्यात आले. ही कारवाई तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या मार्गदर्शना खाली नायब तहसीलदार सी.जी.पवार, मंडळ अधिकारी सचिन पाटील, तलाठी ईश्वर कोळी, शैलेश झोटे यांच्या पथकाने केली.
