भुसावळ-दौंड साप्ताहिक मेमू गाडी गुरूवारपासून बंद
Bhusawal-Daund weekly MEMU train closed from Thursday भुसावळ : भुसावळ-दौंड ही दर गुरूवारी भुसावळ येथून सुटणारी मेमू गाडी रेल्वे प्रशासनाकडून गुरूवारी, 20 जुलैपासून रेल्वे प्रशसानाकडून रद्द करण्यात येत आहे. यामुळे पुण्याकडे जाणार्यांना प्रवाशांना ही गाडी बंद केल्याचा आर्थिक फटका बसणार आहे तसेच पुणे जाण्यासाठी मोठीच गैरसोय होणार आहे. गाडी बंद करण्याचे कुठलेही कारण रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले नाही.
प्रवाशांची होणार गैरसोय
भुसावळ विभागातून दौंडसाठी धावणारी भुसावळ-दौंड मेमू गाडी भुसावळ जंक्शनवरून दर गुरूवारी सकाळी 6.15 वाजता दौड जाण्यासाठी सुटतते. ही गाडी मनमाडमार्गे दौंडला जाते. पुण्याला जाणारे अनेक प्रवासी याच गाडीने दौंडपर्यत जाऊन दौंडवरून अन्य गाडीने पुण्यात पोहोचतात. रेल्वे प्रशासनाकडून भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस ही गाडी फक्त ईगतपुरीपर्यत चालविली जात आहे. ही गाडी पुण्यापर्यंत जात नसल्याने बहुसंख्य प्रवासी हे दौंडपर्यत या गाडीने जातात मात्र आता रेल्वे प्रशसानाकडून ही गाडी सुध्दा बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. ही गाडी आठवड्यातून एक दिवस होती, ती दोन दिवस करावी, अशी प्रवाशांची मागणी होती, हीच गाडी पुढे पुण्यापर्यंत नेण्यात यावी, जेणे करून प्रवाशांची अडचण दूर होईल, मात्र रेल्वे प्रशासनाकडून ही गाडी पुढील आदेश येईपर्यंत रद्द करण्यात आली आहे त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालून ही गाडी रेल्वे प्रशासनाकडून बंद होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.
