एकत्रीत कुटुंबाचा सन्मान हा सर्व समाजासाठी एक आदर्श उपक्रम : भुसावळचे आमदार संजय सावकारे


Honoring the family together is an ideal initiative for the entire society: Bhusawal MLA Sanjay Savkare भुसावळ : एकत्रीत कुटुंबाचा सन्मान हा सर्व समाजासाठी एक आदर्श उपक्रम असल्याचे मत भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी येथे व्यक्त केले. श्री संत सावता माळी शिक्षण मंडळातर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व संत शिरोमणी सावता महाराज यांच्या 728 व्या संजीवन समाधी सोहळ्याप्रसंगी आमदार बोलत होते. आमदार निधीतून माळी समाजमंगल कार्यालयाकरीता 20 लाखांचा निधी घोषित केला.

विद्यार्थी असावा स्मार्ट : कैलास महाजन
अध्यक्षस्थानी डॉ.दत्ता जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.वसंत झारखंडे, रासकर, नितीन सोनवणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी फक्त हुशार असून चालत नाही तर तो स्मार्ट असावा, असे मंडळाचे अध्यक्ष कैलास महाजन म्हणाले. यावेळी समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करणार्‍या सुरेश महाजन, दशरथ सोनवणे यांना समाज भूषण म्हणून म्हणून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मंडळाचे सचिव गजेंद्र महाजन यांनी अहवाल सादर केला. सूत्रसंचालन धनंजय महाजन यांनी तर आभार प्रदर्शन शैलेश माळी यांनी मानले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
सुरेश महाजन, सुधाकर महाजन, सतीश महाजन, शैलेश माळी, दशरथ सोनवणे, धनंजय महाजन, रामकृष्ण माळी, राजू माळी-वाघमारे, कैलास बंड, ईश्वर चौधरी, योगेश महाजन, दिलीप माळी, संजय महाजन, मंगेश भाकरे, मनोज महाजन, राहुल बाविस्कर, गजानन माळी, राजू माळी, राजेंद्र माळी, शेखर महाजन, विजय वानखडे, डी.एन.महाजन व मोठ्या प्रमाणात माळी समाजबांधव उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !