महाराष्ट्रात नवीन सरकार विकासासाठी एकत्र : पंतप्रधान नरेंद्र मोदी
New government in Maharashtra united for development : PM Narendra Modi
पुणे : महाराष्ट्रात आता नवीन सरकार स्थापन झालं असून ते विकासासाठी एकत्र आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणार्या 6400 हून अधिक घरांची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते झाले. यावेळी भाषणात मोदींनी काँग्रेसवर आणि महाविकास आघाडीवर टीका केली. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात 2019 पासून सत्ताबदलाचे राजकारण सुरू आहे. भाजपची सत्ता गेल्यानंतर महाविकास आघडीची सत्ता आली. त्यानंतर अडीच वर्षांनी पुन्हा बंडाचे राजकारण होऊन भाजप आणि शिंदे गट एकत्र आले. आणि नवे सरकार स्थापन केले. आता त्यामध्ये अजित पवारही सामील झाले आहेत.
मेट्रोच्या फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय आणि गरवारे स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या दोन मार्गिकांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. पुणे महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दोन हजार 658 घरांचे लोकार्पण त्यांच्याहस्ते करण्यात आले.




विकासासाठी आम्ही एकत्र
पंतप्रधान म्हणाले की, सत्ता येते आणि जाते, सत्ता आणि देश मात्र तिथेच राहतो. महाराष्ट्रात अनेक पक्ष एकत्र आलेत, या सर्वांचे लक्ष्य एकच आहे. महाराष्ट्राचा विकास करणे. त्यासाठी आम्ही एकत्र काम करतो.
कर्नाटकाची स्थिती चिंताजनक
आज भारत सर्वात गतीने 5 जी सर्व्हिस देणारा देश होत आहे.. या देशातील तरुण सर्वच क्षेत्रात काम करत आहेत. महाराष्ट्र एकीकडे विकास करत असताना दुसरीकडे कर्नाटकात काय होत आहे ते आपण पाहतो. ज्याप्रमाणे विकास होणे अपेक्षित होते तसा कर्नाटक राज्याचा विकास होताना दिसत नाही. ज्या घोषणा दिल्या त्या पूर्ण होत नाहीत.. ही परीस्थिती देशासाठी खुप चिंताजनक आहे. हीच परिस्थिती राजस्थानमध्ये आहे.