भुसावळात 26 रोजी पालकमंत्र्यांचा सत्कार


भुसावळ : शहरातील प्रोफेसर कॉलनीतील बियाणी पब्लिक स्कूलमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा प्रजासत्ताक दिनी 26 रोजी सायंकाळी सहा वाजता भव्य नागरी जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. भुसावळ तालुका व परीसरातील गुलाबराव पाटील मित्र परीवारातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे असतील. यावेळी नगराध्यक्ष रमण भोळे, माजी शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र दायमा आदींची उपस्थिती राहणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !