निसर्गकवी हरपला : ज्येष्ठ कवी ना.धों.महानोर यांचे निधन


Nisargakavi lost : Senior poet Na.Dhon.Mahanor passed away पुणे : निसर्गकवी, लेखक ना. धों. महानोर (80) यांनी गुरुवारी सकाळी पुण्याील रुबी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मूळ गावी पळसखेडे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त होते. त्यांना किडनीचा त्रास होता. त्यांच्या निधनाने साहित्यि वश्वाला धक्का बसला आहे. निसर्गकवी, रानकवी म्हणून त्यांना ओळखले जात असत. दरम्यान, शुक्रवार, 4 रोजी पळासखेडे येथील त्यांच्या गावी सायंकाळी अंत्यविधी केला जाणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, सूना, नातवंडे, पणतू असा परीवार आहे.

साहित्य विश्वात विपूल लेखन
नामदेव धोंडो महानोर यांचा जन्म 16 सप्टेंबर 1942 रोजी झाला होता. त्यांचा जन्म औरंगाबाद जिल्हातील पळासखेडे या गावी झाला होता. त्यांचे शिक्षण पळसखेडे, पिंपळगाव, शेंदुर्णी, जळगाव येथे झाले व त्यांनी आपल्या जन्मगावी शेतीचा व्यवसाय केला. तसेच साहित्य लेखनही विपुल केले. ते विधान परीषदेवर नियुक्त आमदारदेखील होते.

अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध
महानोरांचा पहिला काव्यसंग्रह, रानातल्या कविता (1967). त्यानंतर वही (1970) आणि पावसाळी कविता (1982) असे आणखी दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. गांधारी (कादंबरी1972), गपसप (1972), गावातल्या गोष्टी (1981दोन्ही लोककथासंग्रह) असे गद्यलेखनही त्यांनी केले आहे. त्यांनी केलेले लोकगीतांचे एक संकलनही (पळसरोडची गाणी, 1982) प्रसिद्ध झालेले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !