जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा


जळगाव (23 एप्रिल 2026) : डॉ.वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात गुरुवारी जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. कविता शितल कुमार देशमुख यांच्या हस्ते डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतिमेला हार पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महाविद्यालयाच्या ग्रंथपाल कविता राहुल भोरटके यांनी जागतिक पुस्तक दिनानिमित्त उत्कृष्ट अशी माहिती विद्यार्थ्यांना दिली. वाचनाचे महत्त्व विद्यार्थिनींना समजावून सांगितले. तसेच वर्षभरात सर्वात जास्त पुस्तक वाचन करणारी तृतीय वर्ष बीएस्सीची विद्यार्थिनी दिशा जैन हिला पेन व पुस्तक देऊन ग्रंथालयातर्फे गौरवण्यात आले.

यशस्वीतेसाठी अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर मीनल राणे, एनएसएस को-ऑर्डिनेटर प्रो.जयश्री कुलकर्णी, प्रो.हिमानी जमाले तसेच सर्व शिक्षक वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !