नंदुरबार पोलीस दलात फेरबदल : पाच सहायक निरीक्षकांच्या बदल्या
गणेश वाघ
नंदुरबार (22 एप्रिल 2026) : नंदुरबार पोलीस दलातील पाच सहाय्यक निरीक्षकांच्या विनंती तसेच प्रशासकीय कारणास्तव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी बुधवार, 22 रोजी बदल्या केल्या आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कार्यमुक्त होऊन पदभार स्वीकारावा, असे आदेशात नमूद आहे.
या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या

विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक नरेंद्र गोपाळ साबळे यांची पोलीस अधीक्षकांचे रीडर म्हणून बदली करण्यात आली आहे.
नंदुरबार अधीक्षकांचे रीडर जयेश धुडकू खलाणे यांची विसरवाडी पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी बदली करण्यात आली आहे.
मोलगी ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दीपक जयसिंग पावरा यांची नंदुरबार नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक धर्मराज भरतसिंग पटले यांची मोलगी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
जीवशा शाखेचे सहाय्यक निरीक्षक विश्वास बाबुराव पावरा यांची नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
