137 दिवसानंतर राहुल गांधी संसदेत


Rahul Gandhi in Parliament after 137 days नवी दिल्ली : मोदी आडनाव बदनामी प्रकरणात 23 मार्च रोजी राहुल यांना कनिष्ठ न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यानंतर 24 तासांतच 24 मार्च रोजी त्यांची खासदारकी गेली होती. यानंतर गुजरात उच्च न्यायालयानेही शिक्षा कायम ठेवली होती. याविरोधात राहुल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 134 दिवसांनंतर 4 ऑगस्ट रोजी न्यायालयाने राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर तब्बल 137 दिवसानंतर सोमवारी राहुल गांधी संसद भवनात पोहोचले आहेत.

दुपारी दोन पर्यंत कामकाज तहकूब
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारी सकाळीच राहुल यांना सदस्यत्व बहाल केल्यानंतर संसदे दाखल होताच राहुल यांनी सर्वप्रथम महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. यानंतर ते सदनात गेले. लोकसभेत राहुल आपल्या खुर्चीवर बसले होते, त्यानंतर पाच मिनिटांनी सभागृहाचे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.





लोकसभेत चार विधेयके मांडली जाणार आहेत
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक, 2023 सादर करतील तसेच नॅशनल रिसर्च फाउंडेशन विधेयक, 2023 रिसर्च केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह सादर करणार असून केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया फार्मसी (दुरुस्ती) विधेयक, 2023 सादर करतील व केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल मध्यस्थी विधेयक, 2023 सादर करतील.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !