पहूर पेठच्या तरुणाचा विद्युत शॉक लागल्याने मृत्यू


Youth of Pahur Peth dies due to electric shock पहूर, ता.जामनेर : येथून जवळच असलेल्या लोंढरी शिवारातील कपाशीच्या शेतात पहूर येथील येथील अविवाहित तरुणाचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवार, 12 रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडली.

विद्युत तारेच्या स्पर्शाने मृत्यू
पहुर पेठच्या आंबेडकर नगरमधील रहिवासी आनंदा सांडू मोरे यांचा लहान मुलगा समाधान आनंदा मोरे (34) व त्याची बहिण आशा मोरे तसेच चुलत बहीण सारीका खराटे व मंजुळा घोडेस्वार हे लोंद्री खुर्द शिवारातील शेतात बेलाची पाने घेण्यासाठी पहाटे पाच वाजता पोहोचले असता शेतात काही वीजतारा जमिनीवर तुटून पडल्या असतानाच बेलाचे पान तोडण्यासाठी जात असताना वाटेत तुटलेल्या विजेच्या तारेवर आशाबाई मोरे यांचा पाय पडला. हे पाहुन आशाबाई यांना वाचवण्यासाठी समाधान मोरे याने बहिणीला उचलून बाजूला करीत तिला वाचविले. पण समाधान याचा तोल गेल्याने त्याच्याही पायांना वीजतारांचा स्पर्श झाला त्यामुळे विजेच्या जबर धक्क्याने समाधानचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडली.







ग्रामस्थांची धाव मात्र दुर्दैवी घटनेने मन हळहळले
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत समाधान मोरे याला पहुर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, तपासणी करुन डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे सांगितले समाधान मोरे याचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने पहूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मयत समाधान मोरे यांच्या पश्चात आई- वडील, दोन भाऊ, तीन बहिणी असा परीवार आहे. याबाबत पहुर पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !