गावठी कट्ट्यासह संशयित भुसावळ शहर पोलिसांच्या जाळ्यात


भुसावळ  : भुसावळ शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगणार्‍या अंजाळेतील संशयिताच्या मुसक्या बांधल्या आहेत. ही कारवाई शनिवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास यावल नाक्यावर करण्यात आली. रोहित सुनील सपकाळे (21, अंजाळे, ता.यावल) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळ शहर पोलिसांना अंजाळेतील संशयित गावठी कट्ट्याच्या धाकावर दहशत निर्माण करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी सापळा रचला. शनिवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास रोहित सपकाळे (21, अंजाळे) हा यावल नाक्यावर दुचाकी (एम.एच.19 डी.एफ.2798) आल्यानंतर संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या अंगझडतील दहा हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व एक हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस तसेच 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी जप्त करण्यात आली. याप्रकरणी कॉन्स्टेबल शैलेंद्र लक्ष्मण सपकाळे यांच्या फिर्यादीवरून संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार सैय्यद ईकबाल करीत आहेत.







यांनी केली कारवाई
पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, शहर निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, एएसआय सैय्यद इकबाल, नाईक जाकीर मसुरी, कॉन्स्टेबल संजय ठाकणे, एएसआय जाकीर सैय्यद आदींच्या पथकाने केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !