कर्जापुढे टेकले हात : मुलादेखतच शेतकर्‍याने घेतले विष


Hands bowed before debt : The farmer took poison as a child जळगाव : कर्ज डोईजड झाल्यानंतर ते फेडण्याची सतावत असलेली चिंता पाहता शेतकर्‍याने सात वर्षीय मुलादेखतच विष प्राशन करीत आत्महत्या केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. बाळू भंगू पवार (35) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे.

विष शरीरातच पसरताच शेतकर्‍याचा मृत्यू
बाळू पवार हे बुधवार, 16 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता शेतात कापसावर फवारणी मारायचे कारण देत घरातून निघाले. त्यानंतर दुपारी 12 वाजता शेतात विषारी औषध प्राषण केले. हा प्रकार बाळू पवार यांचा 7 वर्षांचा मुलगा रामेश्वर याच्यासमोरच घडला. लहान मुलाला आधी हा प्रकार समजला नाही. मात्र विषप्राषण केल्यानंतर बाळू पवार यांना त्रास होवू लागल्यानंतर भांबावलेल्या रामेश्वरने बाजूच्या शेतात काम करत असलेल्या इतरांना बोलाविले. इतर शेतकर्‍यांना बाळू पवार यांनी विषप्राषण केल्याचे लक्षात आल्यानंतरच लागलीच जिल्हा सर्वसामान्य रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी उपचार सुरू असतानाच बाळू पवार यांचा मृत्यू झाला.







कर्जापुढे टेकले हात
बाळू पवार हे शेती करत होते मात्र सततची नापीकी, अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक संकटांमुळे पिकांचे नुकसान होत होते. त्यात कुंटूंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी बाळू पवार यांनी कर्जदेखील घेतले होते. आता पुन्हा पावसाने दडी मारल्याने भविष्यात पुन्हा पिकांचे नुकसान झाल्यास कर्ज वाढेल या भितीने बाळू पवार यांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. बाळू पवार यांच्या पश्चात पत्नी लाचाबाई पवार, दोन मुलं, भाऊ असा परिवार आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !