भरधाव कारने उडवले : रीक्षा चालकाचा मृत्यू
Blown up by speeding Car : Rickshaw driver dies जळगाव : भरधाव कारच्या धडकेत रीक्षा चालकाचा दुदैवी मृत्यू झाला. हा अपघात बुधवार, 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी सायंकाळी पाच वाजता कारवरील अज्ञात चालकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव तालुक्यातील उमाळा बसस्थानकाजवळ घडला.
जबर धडकेने रीक्षा चालकाचा जागीच मृत्यू
जळगाव तालुक्यातील उमाळा गावातील बसस्थानकाजवळ बुधवार, 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास रीक्षा क्रमांक (एम.एच.19 व्ही.3768) या प्रवाशी रीक्षाला भरधाव वेगाने येणारी कार क्रमांक (एम.एच.02 बी.आर. 4391) ने जोरदार धडक दिल्याने रीक्षा चालक राजू ओमप्रकाश साहू (45) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रीक्षात असलेले प्रवासी जखमी झाले. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या अपघातात रीक्षासह कारचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी हरी मोहन साहू (30, वाघ नगर, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारवरील अज्ञात चालकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहे.








