तुमच्या खिशातील पाचशे रुपयांची नोट नकली तर नाही ना ! : धरणगाव तालुक्यात नकली नोटात चलनात आणताना दोघे जाळ्यात


Two caught while circulating fake notes in Dharangaon taluka जळगाव : जिल्ह्यात पुन्हा बनावट नोटा चलनात आणल्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी प्रवीण नंदलाल जैस्वाल (मध्य प्रदेश) आणि राधेशाम शरद जाखेटे (रा.वडगाव बु.॥, ता.चोपडा, ह.मु फॉरेस्ट कॉलनी जळगाव) यांच्याविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे गुन्ह्याचे प्रकरण
विजय प्रकाश बडगुजर हे धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या दुकानावर ग्राहक म्हणून आलेल्या दोघांकडून पाचशे रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध धरणगाव पोलिस स्टेशनला रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला. पाचशे रुपये दराच्या 27 नोटा त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक जिभाऊ पाटील करीत आहेत.







 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !