जळगावातील गोलाणी मार्केटमधील अस्वच्छतेने आरोग्य धोक्यात
Jalgaon Golani Market Health Danger जळगाव : शहरताील गोलाणी मार्केटमध्ये नागरीकांसाठी स्वच्छतागृहाची सोय नाही. याचबरोबर जे स्वच्छतागृह आहेत ते अतिशय घाण अवस्थेत असल्याने नागरीकांचे आणि वस्तू विक्रेत्यांचे प्रचंड प्रमाणावर हाल होत असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या ठिकाणी दुकानांमध्ये काम करणार्या कित्येक महिला कर्मचारी आहेत. या ठिकाणी स्वच्छतेची कायमस्वरूपी व्यवस्था नसल्यामुळे आणि स्वच्छतागृह नसल्यामुळे त्या महिलांना रोगराईला सामोरे जावे लागत आहे.
नियमित स्वच्छता करण्याची अपेक्षा
भाजी विक्रेत्यांना व इतर व्यापार्यांना या ठिकाणी कोणतीच स्वच्छतेची सोय नसल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे या ठिकाणी नियमितपणे स्वच्छता केली जावी. याचबरोबर या ठिकाणी स्वच्छतागृहाची ही सोय करावी, अशी मागणी आयुक्त विद्या गायकवाड यांना करण्यात अली. मार्केटमधील अस्वच्छतेचा प्रश्न निकाली काढण्याबाबत आयुक्त विद्या गायकवाड यांना साकडे घालण्यात आले. राजश्री शर्मा, सुनीता चौधरी, रेखा कुलकर्णी, छाया सारस्वत, सुधा काबरा यांच्यातफे हे निवेदन देण्यात आले.


