साकेगाव सरपंच चषकावर ‘जय बजरंग’ संघाची मोहोर
भुसावळ : साकेगाव ग्रामपंचायत व जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट संघटना आयोजित सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात जय बजरंग संघाने जय महाराष्ट्रावर सात गडी राखून विजय मिळवला. गेल्या सहा वर्षात एकही संघ दोन वेळा ही स्पर्धा जिंकू शकला नाही हे विशेष !दरम्यान, विजेत्या संघाचा फोटो व चषक सन्मान म्हणून वर्षभर ग्रामपंचायत कार्यालयात ठेवण्यात येणार आहे.
संघाची बैलगाडीवरून काढली मिरवणूक
अंतिम सामन्यापूर्वी जय बजरंग व जय महाराष्ट्र संघांची ग्रामपंचायत कार्यालयापासून ते मैदानापर्यंत बैलगाडीवरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना जय महाराष्ट्र संघाने निर्धारीत दहा षटकात 64 धावा केल्या. यात डॉ.दीपक पाटील यांनी 29 धावा काढल्या. प्रत्युत्तरात जय बजरंग संघाने विजय लक्ष सात गडी राखून 7 षटकात हर्षल पाटील (बंटी) जय बजरंगच्या या खेळाडूने पाचउत्तुंग षटकार टोलवून नाबाद 48 धावा काढत सहजरीत्या विजय मिळवून दिला व मानाच्या सरपंच चषकावर नाव कोरले. दरम्यान, स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून जय महाराष्ट्राच्या डॉ.दीपक पाटील, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जय महाराष्ट्राच्या शुभम पाटील व मालिकावीर जय बजरंगच्या हर्षल पाटील यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.



विजयी संघांवर बक्षिसांचा वर्षाव
विजय संघ जय बजरंगला ग्रामपंचायतीतर्फे 25 हजार, माजी सरपंच आनंद ठाकरे यांच्याकडून पाच हजार, आमदार संजय सावकारे यांच्याडून तीन हजार, डॉक्टर दीपक पाटील यांच्याकडून तीन हजार, शांताराम कोळी यांच्याकडून दोन हजार, विनोद कोळी यांच्याकडून एक हजार तर नितीन धांडे यांच्याकडून पाचशे रुपयांची बक्षीस देण्यात आले. उपविजेत्या जय महाराष्ट्र संघाला जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेतर्फे पाच हजार, पप्पू पटेल यांच्याकडून पाच हजार, आमदार संजय सावकारे यांच्याकडून दोन हजार, विनोद परदेशी यांच्याकडून दोन हजार शंभर असे रोख व धनादेशद्वारे देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
आमदार संजय सावकारे, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, युनियन बँकेचे शाखा व्यवस्थापक सैय्यद खादिम, सरपंच अनिल पाटील, दिलीपसिंग पाटील, ग्रामविकास अधिकारी गौतम वाडे, माजी सरपंच आनंदा ठाकरे, जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सचिव वासेफ पटेल, समाजसेवक नरेंद्र पाटील, सुरेश पाटील, गजानन पाटील, अनिल सोनवाल, प्रवीण पवार, राजेंद्र पाटील, सुधाकर सोनवणे, नाना चव्हाण राहुल चौधरी, विनोद परदेशी रमजान पटेल, राजू भोईटे पप्पू पटेल, डॉ.दीपक पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.
साडेचार फुटाची ट्रॉफी आकर्षण
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघास राहुल चौधरी यांच्यातर्फे साडेचार फुटाची ट्रॉफी देण्यात आली, हे या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले याशिवाय गावातील समाजसेवक नरेंद्र पाटील यांच्यातर्फे विजयी व उपविजयी संघास ट्रॉफी, महर्षी वाल्मिक युवा मंडळातर्फे विजेत्या उपविजेत्या संघास ट्रॉफी, गणेश मनोरे यांच्यातर्फे विजयी उपविजयी संघास ट्रॉफी, संजय काशिनाथ भोई यांच्यातर्फे विजयी, उपविजयी संघाला ट्रॉफी, अनिल पाथरवट -विजेता संघाला ट्रॉफी, पोलिस पाटील राजू सपकाळे यांच्यातर्फे उत्कृष्ट गोलंदाज व आयोजन कमिटी यांचा सत्कार, विनोद परदेशी यांच्यातर्फे उत्कृष्ट गोलंदाजख फलंदाज, मालिकावीर व समालोचक यांना प्रत्येकी अकराशे रुपये, डॉ.कैलास ठाकरे यांच्यातर्फे स्पर्धेतील संपूर्ण सामनावीरांना ट्रॉफी देण्यात आली. सुधाकर सोनवणे यांच्यातर्फे मालिकावीर ला एक हजार, विलास ठोके यांच्यातर्फे समालोचक यांना गौरविण्यात आले. दरम्यान,
पंच म्हणून राहुल कोळी, शाहरुख शेख, समालोचक म्हणून हाजी रमजान पटेल, गुणलेखक म्हणून राजू भोईटे, तसेच स्पर्धा यशस्वितेसाठी ग्रामपंचायत, आयोजन कमिटी सर्व संघाचे खेळाडू यांनी परीश्रम घेतले.
