क्रिप्टो करन्सीत गुंतवणुकीच्या आमिषाने लाखोंचा गंडा : 150 सीमकार्डसीम मुंबईतील ठग सायबर पोलिसांच्या जाळ्यात


150 Sim Card Sims in Mumbai Cyber ​​Police’s Net for Cheating on Crypto Currency Investments जळगाव : क्रिप्टो करन्सीत गुंतवणुकीच्या आमिषाने लाखोंचा गंडा घालणार्‍या मुंबईतील ठगाला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून विविध बँक खात्यांचे तब्बल 150 चेकबुक, 178 सीमकार्ड, 160 एटीएमकार्ड, इंटरनेट राऊटर, लॅपटॉप , सीपीयु, दबा मोबाईल व प्रिंटर जप्त करण्यात आले. राकेश मिश्रा असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्यास मुंबईतून अटक करण्यात आली. जळगावातील पवन बळीराम सोनवणे यांची क्रिप्टोत गुंतवणुकीच्या आमिषााने 15 लाखांची फसवणूक झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली

टास्क देवून फसवणुकीचा गंडा
सोशल मीडियावर नागरीरकांना बाहेरील देशातील कोड क्रमांवरुन मॅसेज प्राप्त होत असून त्यांना कोणीतीही गुंतवणूक न करता दररोज पाचशे ते हजार रुपये कमवा असे मॅसेज येत आहे. त्यानंतर नागरीकांना विविध टास्क देवून त्यांच्या बँकेमध्ये पाचशे ते पाच हजारपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये ऑनलाईन पाठविले जातात. त्यानंतर पुन्हा प्रिपेड टास्क टास्क देवून त्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेतले जातात आणि त्यावर त्यांना कमीशन देखिल दिले जाते. तसेच क्रिप्टो करन्सीत त्यांनी गुंतवणूक केल्यास त्यावर मोठा प्रमाणात नफा मिळत असल्याचे सांगून बनावट क्रिप्टो करंन्सी ट्रेडिंग वेबसाईटवर यूजर आयडी तयार केले जाते. या अमिषाला जळगावातील पवन बळीराम सोनवणे हे बळी पडले. त्यांनी सात विविध बँकांमध्ये सुमारे 15 लाख 35 हजार रुपये भरुन क्रिप्टो करंन्सीमध्ये गुंतवणुक केली होती. दरम्यान, त्यांना आपली फसवणुक झाल्याचे कळताच त्यांनी लागलीच याबाबतची तक्रार सायबर पोलीसात दिली होती. त्यानुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.







तांत्रिक विश्लेषणाअंती गुन्हा उघडकीस
या गुन्ह्याचे सायबर पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांनी तांत्रिक विश्र्लेषण केले. यात पवन सोनवणे यांनी ज्या बँक खात्यामध्ये पैसे भरले होते. ती खातील देशातील विविध राज्यांतील असल्याचे उघड झाले. त्यानंतर सायबर पोलिसांच्या पथकाने श्रीनगर येथून एका संशयिताला ताब्यात घेतले होते व त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने मुंबईतील ठगाची संशयिताची माहिती दिल्यानंतर मुंबई येथून राकेश मिश्रा या ठगाच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, पोलीस निरीक्षक बबन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर थोरात, हवालदार प्रवीण वाघ, राजेश चौधरी, दिलीप चिंचोले आदींच्या पथकाने ही कारवाई केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !