बोदवडच्या वयोवृद्धाची विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या
Elderly of Bodwad committed suicide by consuming poisonous medicine बोदवड : शहरातील माळी गल्लीतील 60 वर्षीय वयोवृद्धाने उंदीर मारण्याचे औषध प्राशन करीत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. या प्रकरणी बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुभाष सखाराम माळी (60) असे मयताचे नाव आहे.
उंदीर मारण्याचे औषध प्राशन करीत आत्महत्या
माळी यांनी उंदीर मारण्याचे औषध प्राशन केल्यानंतर त्यांना अत्यवस्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना 19 ऑगस्ट रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. याबाबतची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार रवींद्र गुरचळ करीत आहेत.








