अमळनेरातील डॉक्टरांनी केला महिला रुग्णाचा विनयभंग


A doctor in Amalnera molested a female patient अमळनेर : उपचारासाठी आलेल्या 25 वर्षीय विवाहित महिलेचा डॉक्टरांनी विनयभंग केल्याची संतापजनक घटना शहरात घडली. याप्रकरणी डॉ.अनिल शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

डॉक्टरांवर केला विनयभंगाचा आरोप
चोपडा तालुक्यातील एका महिलेस 10-12 दिवसांपासून पोट पोटदुखीचा त्रास होत असल्याने तिने धुळे येथील एका दवाखान्यात सोनोग्राफी केली. तेथील डॉक्टरांनी तीला अपेंडिक्सचा त्रास असल्याबाबत सांगितले. यानंतर ती अमळनेर येथे आली. तपासणी दरम्यान, डॉ.शिंदे यांनी बुधवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता डॉक्टरने आपला विनयभंग केल्याचे पीडीत महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.







दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच डॉ.शिंदे यांच्या नर्मदा फाउंडेशन हॉस्पिटलच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर संतप्त जमाव जमला. संबंधित डॉक्टरला आमच्या ताब्यात द्या, अशी ते मागणी करण्यात आली. डीवायएसपी सुनील नंदवाळकर व पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी जादा कुमक बोलावून परीस्थिती नियंत्रणात आणली. गुन्हा दाखल व्हावा, म्हणून रात्री जमाव पोलीस स्टेशनसमोर थांबून होता. दरम्यान, डॉ. शिंदे यांच्याविरुद्ध विनयभंग आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. डीवायएसीपी सुनील नंदवाळकर पुढील तपास करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !