सासर्याने संपत्तीत हिस्सा न दिल्याने पत्नीला छळले
The father-in-law tortured the wife for not giving her share in the property जळगाव : पत्नीच्या वडिलांनी अर्थात सासर्याने त्यांच्या संपत्तीत हिस्सा दिला नाही तसेच विवाहितेने माहेरुन 10 लाख रुपयेन आणल्याने तिचा छळ करण्यात आला. याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहा लाखांसाठी छळ
जळगावातील सदगुरुनगरमधील माहेर असलेल्या सायली संदीप माळी यांचा भडगाव येथील संदीप श्रीराम माळी यांच्याशी विवाह झाला. त्यानंतर काही दिवसांनी घर घेण्यासाठी माहेरुन 10 लाख रुपये आणावे, अशी मागणी करण्यात येऊ लागली. या सोबतच सायली यांच्या वडिलांच्या संपत्तीत हिस्सा दिला नाही म्हणून विवाहितेचा छळ केला जाऊ लागला.








