मुक्ताईनगरात 23 वर्षीय विवाहितेवर अत्याचार : पिता-पूत्रांना अटक
Abuse of 23-year-old married woman in Muktainagar : Father and son arrested मुक्ताईनगर : शहरातील एका भागातील 23 वर्षीय विवाहितेवर घरी कुणी नसताना नराधम तरुणाने अत्याचार केला शिवाय पीडीतेच्या आईने याबाबत जाब विचारल्यानंतर आरोपीच्या पित्याने मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिता-पूत्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली.
घरी कुणी नसताना केला अत्याचार
मुक्ताईनगर शहरातील एका भागात 23 वर्षीय विवाहित तरुणी परीवारासह वास्तव्याला आहे. शनिवार, 19 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता पीडीता घरी एकटी टीव्ही पाहत असताना संशयित आकाश दादाराव सोळंके याने अनधिकृतरीत्या घरात प्रवेश करीत तरुणीवर अत्याचार केला व तसेच मारहाण केली. तरुणीने हा प्रकार आईला सांगितल्यानंतर जाब विचारण्यासाठी ती आरोपीकडे गेल्यानंतर आरोपीचे वडील दादाराव सोळंके यांनी शिवीगाळ केली. हा प्रकार घडल्यानंतर पीडीतेने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने संशयित आरोपी आकाश दादाराव सोळंके आणि त्याचे वडील दादाराव सोळंके या दोघांविरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहेत. संशयितांना अटक करण्यात आली.








