प्रवाशांनी भरलेली जीप उलटली : नऊ प्रवासी ठार
Jeep full of passengers overturned: Nine passengers killed वायनाड : केरळमधील वायनाडमध्ये प्रवाशांनी भरलेली जीप उलटून झालेल्या अपघातात नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला तर मंतांमध्ये सर्वाधिक महिला आहेत. माहितीनुसार, दुपारी साडेतीनच्या सुमारास वल्लाड-मानंथवाडी रस्त्यावर हा अपघात झाला. गाडीत 12 जण होते. वायनाड हा काँग्रेस नेते राहुल गांधींचा लोकसभा मतदारसंघ आहे. त्यांनी देखील या अपघातावर शोक व्यक्त केला.
जखमींना बरे होण्यासाठी राहुल गांधींनी केली प्रार्थना
या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना, खासदार राहुल गांधी म्हणाले की, वायनाडमधील मानंथवाडी येथे झालेल्या जीप दुर्घटनेने मला खूप दुःख झाले आहे. जिल्हाधिकार्यांशी बोलून तातडीने पाऊले उचलण्यास सांगितले आहे. माझे विचार शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी मी प्रार्थना करतो.




एका स्थानिक रहिवाशाने मीडियाला सांगितले की, जीप एका खासगी चहाच्या बागेत काम करणार्या महिलांना घेऊन मक्कीमालाला परतत होती. या अपघातात जखमी झालेल्यांना मानंथवाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु त्यातील नऊ जणांचा मृत्यू झाला.