दहिवदला 25 वर्षीय तरुणाचा खून


पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून घडली घटना

चाळीसगाव- अनैतिक संबंधातून 25 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना तालुक्यातील दहिवला रविवारी रात्री घडली. या घटनेत वाल्मीक उर्फ जिभाऊ ओंकार जाधव (25) या तरुणाचा मृत्यू झाला. खुनानंतर पोलिसांनी संशयित आरोपी दादाभाऊ पांडुरंग देवरे (धनगर) यास अटक केली आहे.

ट्रक चालकाचा अनैतिक संबंधातून खून
मृत ट्रक चालक वाल्मीक उर्फ जिभाऊ जाधव हा गावातील सोनू मोबाईल नावाच्या दुकानाजवळ काही लोकांसह शेकोटीवर बसला असताना दुचाकीवरून आलेल्या दादाभाऊ देवरे याने वाल्मीकच्या पाठीमागून येऊन लोखंडी पाइपने डोक्यावर वार केला. यात गंभीर जखमी झालेल्या वाल्मीक जाधव यास खासगी वाहनातून चाळीसगाव येथील दवाखान्यात दाखल केले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. दरम्यान, आरोपीच्या पत्नीचे ट्रकचालक तरुणाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने त्यातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !