कोळगावात धाडसी घरफोडी : संशयित नागरीकांनीच पकडले
Daring house burglary in Kolgaon : Suspect caught only by civilians भडगाव : भडगाव तालुक्यातील कोळगाव येथील महिलेचे बंद घरात मध्यरात्री घरफोडी करताना संशयिताना नागरीकांना जाग आल्याने पकडण्यात यश आले. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात आनंद प्रकाश खैरे (23, एकलहरे, ता.चाळीसगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली.
घरफोडी करताना आली जाग घरे चोरट्यांना पर्वणी
अनिल पुंजू केदार (47, रा.कोळगाव, ता.भडगाव) हा तरुण आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. शनिवार, 26 ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्याचे घर बंद असताना चोरट्यानीं प्रवेश करीत 35 हजारांची रोकड व सोन्याचे दागिणे लांबवले मात्र चोरट्यांच्या पावलांचा आवाज ऐकून केदार यांच्या आईला जाग आल्यानंतर त्यांनी आरडा-ओरड केल्यांतर संशयिताने त्यांचा गळा आवळून त्यांना मारहाण केल्यानंतर कुटूंबातील सदस्यांना जाग आल्यानंतर चोरट्याला पकडण्यात यश आले. याप्रकरणी भडगाव पोलिसात आनंदा खैरे (23, एकलहरे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे करीत आहे. दरम्यान, संशयिताच्या अटकेनंतर घरफोडींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.








