काय सांगता : जळगाव पोलीस दलातील सहाय्यक फौजदाराला तीन लाखांचा गंडा
What to say : A bribe of three lakhs to an assistant police officer in Jalgaon police force जळगाव : जिल्ह्याल बीट कॉईनमध्ये फसवणूक झाल्याच्या एकीकडे वाढल्या असताना आता जळगाव जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक फौजदारालाच तीन लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. सोन्याचे कॉइन घेण्याचे आमिष दाखवत सेवानिवृत्त सहाय्यक फौजदाराला तीन लाख एक हजार रुपयात गंडवण्यात आले. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे फसवणूक प्रकरण
पुरुषोत्तम सुपडू लोहार (63, रा.मयूर कॉलनी, पिंप्राळा) हे पोलीस दलात सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत होते. काही वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले. त्यानंतर त्यांच्याकडे निवृत्ती वेतनाची रक्कम जमा झाली होती. त्यावेळी मुंबई येथील भैया पाटील व कामता सोनी या नावाच्या दोन व्यक्तींनी लोहार यांच्याशी ओळख निर्माण केली. भैया पाटील यांनी शहरातील एका नामांकीत हॉटेलमध्ये बोलवून त्यांना गुंतवणुकीचे अमिष दाखविले. त्यानंतर त्यांना कंपनीत सोन्याचे कॉइन घेऊन कंपनीत गुंतवणूक करण्याचे सांगून एक आयडी दिला त्यामध्ये दर महिन्याला अडीच हजार रुपये मिळेल, असे सांगण्यात आले त्यानंतर वेळोवेळी तीन लाख एक हजार रुपये त्यांच्याकडून दोघांनी घेतले परंतु मात्र कोणताही फायदा मिळाला नाही, तसेच पैसे मागूनदेखील परत मिळाले नाही,








