शिरपूरच्या महिलेची भडगाव बसस्थानकातून 50 हजारांची पोत लांबवली


50,000 was extended from Shirpur woman from Bhadgaon bus stand भडगाव : बसच्या प्रतीक्षेत असलेल्या शिरपूर येथील महिला प्रवाशाची भामट्याने 50 हजार रुपये किंमतीची व 24 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत लांबवल्याची घटना भडगाव बसस्थानकात बुधवार, 23 रोजी दुपारी 12 वाजता घडली. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तीन दिवसानंतर गुन्हा दाखल
बेबीबाई रमेश पाटील (52, रा.माळीनगर, शिरपूर ता. धुळे) या महिला आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. आपल्या नातेवाईकांकडे ते भडगाव तालुक्यात आल्या असता बुधवार, 23 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास बेबीबाई पाटील या भडगाव बस स्थानकाच्या आवारात उभ्या असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 24 ग्रॅम वजनाची व 50 हजार रुपये किंमतीची सोन्याची मंगलपोत लांबवली. पोत चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने भडगाव पोलीस ठाण्यात घेऊन तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात भडगाव पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तात्याबा नागरे आहे









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !