मराठा समाजबांधवांवरील चुकीचे गुन्हे मागे घेणार : मुख्यमंत्र्यांची घोषणा ; फडणविसांनी मागितली मराठा समाजाची माफी


Will withdraw wrongful crimes against Maratha community members : Chief Minister’s announcement; Fadnavis apologized to the Maratha community मुंबई : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून पोलीस उपअधीक्षकांचे निलंबन करण्यात आले असून मराठा समाजबांधवांवर चुकीच्या पद्धत्तीने दाखल केलेले गुन्हे मागे घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. दरम्यान, घडलेल्या प्रकाराबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची माफी मागितली आहे.

फडणवीसांनी मागितली माफी
आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्यानंतर सर्वाधिक टिका उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर होत आहे तर शरद पवारांनी लाठी हल्ल्याचे आदेश मंत्रालयातून आल्याची शंका व्यक्त केल्यानंतर या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. खरं म्हणजे ही दुर्दैवी घटना आहे. तसेच अशा प्रकारच्या बळाच्या वापराचे समर्थन केलं जाऊ शकत नाही. ही घटना दुर्दैवी घटना असल्याचे सांगत अशा प्रकारच्या बळाच्या वापराचे समर्थन केलं जाऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं.

आम्ही कधीही बळाचा वापर केला नाही
फडणवीस म्हणाले की, मी आधीही पाच वर्षे गृहमंत्री होतो. त्या काळात आरक्षणासंदर्भात वेगवेगळ्या प्रकारची दोन हजार आंदोलनं झाली. परंतु कधीही आम्ही बळाचा वापर केलेला नाही तसेच आताही बळाचा वापर करण्याचं कारण नव्हतं. त्यामुळे ज्या निष्पाप नागरीकांना बळाच्या वापरामुळे इजा झाली आहे. जे जखमी झाले आहेत त्यांच्याप्रति मी शासनाच्या वतीने क्षमायाचना करतो. या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच या संदर्भातील दोषींवर कारवाई करण्याचा निर्णयही मुख्यमंत्र्यांनी घेतला असल्याचे ते म्हणाले.

चुकीचे गुन्हे मागे घेणार : मुख्यमात्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच काळात मराठा समाजाला आरक्षण मिळाले तसेच महाराष्ट्र समाजासाठी ओबीसींना ज्या सवलती मिळतात, त्याही सवलती मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं त्यामुळे, हे सरकार मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. जालन्यातील घडलेला प्रकार हा घडायला नको हवा होता. मात्र या घटनेची गंभीर दखल घेत तेथील एसपींची बदली करण्यात आली असून दुसर्‍या पोलीस अधिकार्‍यांकडे पदभार देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच, चुकीच्या पद्धतीने दाखल करण्यात आलेले गुन्हेही मागे घेतले जातील, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

चुकीने दाखल केलेले गुन्हे मागे घेणार
पोलीस खात्याचे अ‍ॅडिशनल डीजी तिथं जाऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतील. पोलीस महासंचालकांच्या माध्यमातून या सर्व घटनेची चौकशी होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जालन्यातील घटनेत आंदोलकांवर चुकीच्या पद्धतीने झालेल्या केसेस शासन माघारी घेणार, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे, त्याची दखल राज्य शासनाने घेतली आहे. त्यासाठी, महसूल विभागाच्या सचिवांसह एक समिती गठित करण्यात आली असून एक महिन्यात समिती आपला अहवाल सादर करेल. जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार कुणबी समाजाच्या दाखल्यासंदर्भात लवकरच या समितीच्या माध्यमातून निर्णय होईल.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !